पत्नी गेली माहेरी, पतीची ‘शोले’तील ‘वीरू`गिरी

Last Updated: Monday, April 28, 2014, 16:34

कूद जाऊंगा फांद जाऊंगा... सुसाइड.... सुसाइड असं म्हणणारा ‘शोले’ वीरू म्हणजे धर्मेंद्र आपल्या आठवत असेल. एका पतीराजाने आपली पत्नी माहेरून परत यावी यासाठी शोले चित्रपटातील ‘वीरू’गिरी केल्याची घटना अमरावती जिल्ह्यात वऱ्हा या गावी घडली आहे. यासाठी तो चक्क दीडशे फूट उंच मोबाईल टॉवरवर चढला.

पोलिसांच्या भरधाव गाडीला अपघात, सहा ठार

Last Updated: Wednesday, May 1, 2013, 20:42

अमरावती पोलिसांच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या गाडीला अपघात झालाय. या अपघातात तीन पोलीस अधिकारी आणि तीन पोलीस कॉन्स्टेबल्स अशा सहा जणांचा मृत्यू झालाय. तर तीन जण जखमी झालेत.

दुष्काळासाठी असणारा पैसा जातो कुठे?- राज

Last Updated: Monday, March 25, 2013, 00:07

गेल्या काही सभांमधून राज ठाकरे अजितदादांना सातत्यानं लक्ष्य करत आहेत. अमरावतीतल्या सभेतही अजितदादांना लक्ष्य केलं. सिंचनकामांचे ७० हजार कोटी रुपये गेले कुठे ? असा सवाल त्यांनी केला.

स्कूल व्हॅनचा अपघात; चार चिमुकले ठार, नऊ जखमी

Last Updated: Tuesday, November 27, 2012, 15:18

अमरावतीत एका स्कूल व्हॅनला भीषण अपघात झालाय. अपघातात तीन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला तर दहा विद्यार्थी जखमी झालेत. दोन मुलांना किरकोळ जखमा झाल्यात.

मद्यधुंद तरूणी बॉइज होस्टेलवर मुक्कामी

Last Updated: Sunday, November 4, 2012, 09:20

मुंबईत राहणाऱ्या सध्या अमरावतीत शिक्षण घेत असलेल्या तीन मुलींचे प्रताप आईवडिलांना चकीत करणारे लावणारे आहेत. ‘बॉइज होस्टेल’मध्ये मुक्कामी राहून मद्यधुंद अवस्थेच डीजेचा ताल धरणाऱ्या या कॉलेज तरूणींना पोलिसांनी ताब्यात घेतले. यातील काही मुले ही दिल्ली आणि बिहारची आहेत.

अमरावतीतील रोकड हा पक्षनिधी- ठाकरे

Last Updated: Monday, February 13, 2012, 14:46

अमरावतीत नाकाबंदीदरम्यान पोलिसांनी जप्त केलेल एक कोटी रूपये हा पक्षनिधी असल्याचा खुलासा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केला आहे. उमेदवारांना हा पैसा देण्यात येणार असल्याचं माणिकरावांनी सांगितलय. काल अमरावती पोलिसांनी एका गाडीतून एक कोटींची रक्कम जप्त केली होती. फोर्ड गाडीतून हे पैसै आणण्यात आले होते. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा पैसा मतदारांना वाटण्यासाठी आणण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता. मात्र हा पैसा पक्षनिधी असल्याचं माणिकरावांनी स्पष्ट केलं.