खड्डे चुकवताना विद्यार्थीनीनं गमावला जीव, student died in accident with truck in jalgaon

खड्डे चुकवताना विद्यार्थीनीनं गमावला जीव

खड्डे चुकवताना विद्यार्थीनीनं गमावला जीव
www.24taas.com, झी मीडिया, जळगाव

रस्त्यावरील खड्डे चुकवत चाललेल्या चाललेल्या तरुणीला आपले प्राण गमवावे लागल्याची दुर्दैवी घटना घडलीय. सायकलवरून जाताना खड्डे चुकवण्याचा प्रयत्न करताना पाठिमागून येणारा ट्रककडे तिचं दुर्लक्ष झालं आणि १७ वर्षीय शितल खंडाळकर या पळासखेड गावातल्या विद्यार्थिनीला आपले प्राण गमवावे लागलेत.

पळासखेड्याहून सायकलवर निघालेल्या शितल खंडाळकर या बारावीच्या विद्यार्थिनीच्या डोक्यावरून ट्रकचं मागील चाक गेल्यानं शितलचा जागीच मृत्यू झाला. जळगाव-औरंगाबाद रस्त्यावरच्या वाकोद गावात ही घटना घडलीय. या घटनेनंतर संतप्त जमावानं ट्रक चालकाला बेदम मारगाण करत ट्रकवर जोरदार दगडफेक केली. घटनास्थळी आलेल्या पहूर पोलीस स्टेशनच्या जीपवरही संतप्त जमावानं दगडफेक केली. यामुळं पोलिसांना माघारी फिरावं लागलं.

रस्त्यांची कामं खराब झाल्यामुळे सध्या पावसाळ्यामुळे रस्त्यांवर खड्डे पडलेत. याकडे सार्वजनिक विभागाचंही दुर्लक्ष झालंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, August 27, 2013, 10:17


comments powered by Disqus