Last Updated: Thursday, May 17, 2012, 18:49
www.24taas.com, नागपूरनागपुरात अण्णांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यानंतर आता आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झालीय. यात अण्णा हजारे विरुद्ध नितीन राऊत असा नवा संघर्ष पेटलाय. काल रात्री जेव्हा ताफ्यातल्या गाडीवर हल्ला झाला, त्यावेळी रोहयो मंत्री नितीन राऊत यांचे पुत्र कुणाल राऊत त्याठिकाणी उपस्थित होते.
यावरुन हा हल्ला कुणी केला हे समजू शकतो, असा आरोप अण्णांचे सहकारी सुरेश पठारे यांनी केलाय. गेल्या काही दिवसांपासून जलसंधारणाच्या कामावर अण्णा टीका करतायेत, तसच येत्या काही काळात अण्णा रोहयोच्या कामातील भ्रष्टाचारही उघड करणार होते. त्याचमुळे हा हल्ला झाल्याचं पठारे यांचं म्हणणय. तर कुणाल राऊत यांनी मात्र हे आरोप फेटाळलेत.
हल्ला झाला त्या ठिकाणी होतो, मात्र हल्ल्यात कोणताही सहभाग नसल्याचं त्यांनी म्हटलय. तर दुसरीकडे नितीन राऊत यांनी मात्र या हल्ल्याचं समर्थन करत, नेत्यांचा अनादर खपवून घेणार नाही, असं म्हटलय.
सिंचनाचा निधी वळू देणार नाहीदरम्यान, केंद्राच्या सिंचनाचा निधी इतरत्र वळू न देण्याचा इशारा जलसंधारण आणि रोहयो मंत्री नितीन राऊत यांनी सरकारला दिलाय. राज्यपालांच्या अधिकारातच केंद्र सरकारच्या निधीचं वापट व्हायला हवं असंही त्यांनी नमूद केलंय.
तसंच राज्यापालांचे अधिकार काढून घेण्याचा प्रयत्न झाला तर तो हाणून पाडणार असल्याचा इशाराही राऊत यांनी दिलाय. तर माणिकराव ठाकरेंनीही राऊतांना समर्थन केलंय. त्यामुळं आता काँग्रेस नेत्यांकडूनच मुख्यमंत्र्यांना घरचा आहेर मिळालाय.
First Published: Thursday, May 17, 2012, 18:49