Last Updated: Wednesday, May 23, 2012, 08:18
अमोल देशपांडे, www.24taas.com, नागपूर नागपूर विमानतळावर बसवण्यात आलेल्या इंद्र रडारमुळे विमानप्रवास अधिक सुरक्षित झालाय. इंद्रमध्ये बसवण्यात आलेल्या अत्याधुनिक सॉफ्टवेअरमुळं विमानांची संभाव्य टक्कर टाळता येणार आहे.
नागपुरच्या आकाशातील विमानांचा प्रवास आता अधिक सुरक्षित झालाय. नागपूर विमानतळावर बसवण्यात आलेल्या अत्याधुनिक इंद्र रडारमुळं ही सुरक्षितता मिळाली आहे. इंद्र रडारमध्ये टक्करविरोधी सॉफ्टवेअर बसवण्यात आलंय. त्यामुळं आकाशातील विमानांमधील अंतरावर नियंत्रण ठेवता येणार आहे. तसंच संभाव्य टक्कर होण्याआधी संबधित विमानाच्या पायलट्सना इशारा देता येणार आहे. त्यामुळं नागपूरच्या आकाशातून जाणा-या सातशे विमानांचा प्रवास आता सुरक्षित झालाय.
नागपूर विमानतळावरील नियंत्रणकक्षातून जयपूर ते बंगळुरु आणि हैदराबादपर्यंतच्या विमानांवर नजर ठेवता येणार आहे. नागपुरच्या इंद्र रडारला नागरी उड्डाण मंत्रालयाकडून विशेष पुरस्कारही मिळालाय. देशातल्या सर्वच विमानतळांवर इंद्र बसवल्यास देशातला विमानप्रवास बिनधोक होईल हे निश्चित.
First Published: Wednesday, May 23, 2012, 08:18