राणेंच्या आरोपांचं मुख्यमंत्र्यांकडून समर्थन - Marathi News 24taas.com

राणेंच्या आरोपांचं मुख्यमंत्र्यांकडून समर्थन

झी २४ तास वेब टीम, अमरावती
 
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंवर भाजप तसंच एनजीओकडून सुपारी घेतल्याच्या नारायण राणेंनी केलेल्या आरोपाचं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी समर्थन केलंय. अमरावतीतल्या धामणगाव रेवले पालिकांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री आले होते.त्यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना लोकपाल विधेयकाबाबत अण्णा हजारेंना श्रेय दिलं पाहिजे याबाबत वाद नाही मात्र, त्यांच्या हटवादी स्वभावावर मुख्यमंत्र्यांनी टीका केली आहे. काँग्रेसला विरोध आणि एका 'विशिष्ट पक्षाला फायदा' असं अण्णा वागत असल्यामुळे अण्णांच्या भूमिकेवर शंका उपस्थित होते असा स्पष्ट आरोप मुख्यमंत्र्यांनी अण्णांवर केलाय.

First Published: Monday, December 5, 2011, 02:50


comments powered by Disqus