मुलीची हत्या करून मातेनं केली आत्महत्या - Marathi News 24taas.com

मुलीची हत्या करून मातेनं केली आत्महत्या

www.24taas.com, नागपूर
 
नागपुरात आपल्याच ४ वर्षाच्या चिमुकलीच्या गळ्यावर चिरून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या आईनं आत्महत्या केलीय. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडालीय.
 
वैशाली भाके या ४ वर्षांच्या मुलीवर तिची आई शीला भाके हिनं गळ्यावर कोयत्याने वार करुन हत्या केली होती. नागपूरच्या रघुजी नगर भागात ही घटना घडली. दारुडा पती आणि घरच्या आर्थिक परिस्थितीतून भाके पती-पत्नीमध्ये नेहमी भांडण होत असत. यातूनच ही दुर्दैवी घटना घडल्याचं सांगण्यात येतंय. तसंच हे निर्दयी कृत्य करणारी मुलीची आई शीला भाके  ही मनोरुग्ण असून ती एका भोंदू बाबाकडून यावर उपचार घेत असल्याचीही चर्चा होती.
 
छोट्या वैशालीच्या हत्येनंतर शीला भाके फरार झाली होती. गुरुवारी, तिचा मृतदेह सेवाग्रामच्या रेल्वे रुळावर आढळला. रेल्वेसमोर येऊन तिनं आत्महत्या केली असावी, असा अंदाज पोलिसांनी वर्तवलाय.
 
.

First Published: Friday, June 29, 2012, 09:03


comments powered by Disqus