मुलीला फिरायला नेलं, सामूहिक बलात्कार - Marathi News 24taas.com

मुलीला फिरायला नेलं, सामूहिक बलात्कार

www.24taas.com, चंद्रपूर
 
नववीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना चंद्रपुरात घडली. इथल्या इंदिरानगर भागात राहणा-या मुलीला तिच्या शेजारच्या मुलानं फिरायला येण्याची गळ घातली.
 
त्यानंतर बाईकवरुन तो त्या मुलीला जंगलात घेऊन गेला... जंगलात आधीच दबा धरुन बसलेल्या इतर दोन मित्रांच्या मदतीनं या मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. हे नराधम इतक्यावरच थांबले नाहीत तर त्यानंतर त्यांनी या सा-या प्रकाराची एमएमएस क्लिप बनवली..
 
घटनेमुळं भेदरलेल्या या पीडित मुलीनं तिथून कसाबसा पळ काढला आणि पोलीस स्टेशन गाठलं... मुलीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी या तिन्ही नराधमांना अटक केलीय.. विशेष म्हणजे यांत एक अल्पवयीन मुलगा आणि पुण्यातल्या कॉल सेटरमध्ये काम करणा-या एका मुलाचा समावेश आहे...
 
 
 

First Published: Saturday, July 14, 2012, 07:54


comments powered by Disqus