तावडेंना संधी, फुंडकरांची उचलबांगडी - Marathi News 24taas.com

तावडेंना संधी, फुंडकरांची उचलबांगडी

झी २४ तास वेब टीम, नागपूर
 
विधान परिषेदेच्या विरोधी पक्ष नेतेपदावरुन पांडुरंग फुंडकरांची गच्छंती झालीये. तर विनोद तावडेची नवी विरोधीपक्षनेते म्हणून नियुक्ती करण्यात आलीये.
 
 
नागपूरात पत्रकारपरिषदेत वरिष्ठ नेते व्यंकय्या नायडू यांनी घोषणा केलीय.. व्यंकय्या नायडूंनी सकाळीच भाजप नेत्यांची बैठक बोलावली होती या बैठकीत आमदारांशी चर्चा केल्यानंतरच विरोधी पक्षनेतेपदी विनोद तावडेंची नियुक्ती करण्यात आलीय. तावडेंच्या या नियुक्तीवर पांडुरंग फुंडकर मात्र नाराज असल्याची चर्चा रंगतेय.
 
व्यंकय्या नायडूंच्या पत्रकार परिषदेलाही फुंडकरांनी दांडी मारली. तावडेंची नियुक्ती ही मुंडे गटाला मोठा धक्का मानल्या जातेय. पुन्हा एकदा गडकरी गटाने मुंडे गटाला जबर हादरा दिल्याचीच चर्चा भाजप नेत्यांमध्ये रंगत आहे.

First Published: Friday, December 16, 2011, 10:08


comments powered by Disqus