निकृष्ट बांधकामामुळे चौपदरी रस्ता खचला - Marathi News 24taas.com

निकृष्ट बांधकामामुळे चौपदरी रस्ता खचला

www.24taas.com, चंद्रपूर
 
औद्योगिक शहर असलेलं चंद्रपूर आंध्रप्रदेशाशी जोडलं जावं यासाठी सुमारे 100 किमी लांबीचा चार पदरी रस्ता बांधला जातोय. पण चंद्रपूरजवळच ताडाळी या गावी मधोमध हा रस्ता खचलाय. त्यामुळे हा महत्वाकांक्षी प्रकल्प सदोष बांधकाम आणि निकृष्ट दर्जामुळे वादाच्या भोव-यात सापडलाय.
 
चंद्रपूर शहराजवळ असलेल्या ताडाळी गावातला रस्ता मधोमध खचला. असा रस्ता म्हणजे अपघातांना आमंत्रण. दोन शहारांमधला हा छोटासा रस्ता नाही तर चंद्रपूरला उपराजधानी नागपूरशी आणि पुढे आंध्रप्रदेशशी जोडणा-या महत्वाकांक्षी प्रकल्पाचा हा भाग आहे. चंद्रपूरातील अब्जावधींची खनिज संपदा जलद वाहतूकीने इतरत्र पोचावी आणि औद्यागिकिकरणाला चालना मिळावी हा या चौपदरी महामार्गाचा उद्देश. पण सदोष बांधकाम आणि निकृष्ट दर्जामुळे ताडाळीत रस्त्याच्या मधोमध असा रस्ता खचलाय.
 
या महामार्गाचं बांधकाम सदोष असल्याच्या तक्रारी याआधीही सार्वजनिक बांधकाम विभागाला आल्या होत्या. मात्र ताडाळीत या प्रकारानंतर संबंधित कंत्राटदारांना यासदंर्भात नोटीसा बजावण्यात आल्यात. अधिक नफा कमावण्यासाठी चंद्रपूरकरांचं स्वप्न धुळीस मिळवायचा आणि अनेक वाहनधारकांचा जीव धोक्यात घालण्याचा अधिकार कंत्राटदारांना कुणी दिला, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत तसंच त्यांना चाप कसा बसणार हा ही मुद्दा आहेच.
 
 

First Published: Thursday, July 26, 2012, 17:09


comments powered by Disqus