Last Updated: Monday, December 19, 2011, 11:42
झी २४ तास वेब टीम, नागपूर 
युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे आज नागपूरात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यांनी मुंबईतल्या शैक्षणिक प्रश्नांबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. त्यापुर्वी विधानभवनातल्या पत्रकार परिषदेत कसलेल्या राजकीय नेत्याप्रमाणे प्रश्नांना उत्तरे दिली.
अधिवेशनानिमित्त विधिमंडळ परिसरात आदित्य यांनी हजेरी लावली. आज ते विधिमंडळाचे कामकाज पाहणार आहे. इंटरनेटवर निर्बंध घालण्याचा सरकारचा प्रस्ताव चुकीचा असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. यावर निर्बंध आणण्यापेक्षा बिग बॉसवर निर्बंध आणा अशी सुचनाच केली.
युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यामुळे नवी राजकारणाची समीकरणं तयार होत आहे का? अशी चर्चा मात्र नक्कीच रंगणार आहे. त्यामुळे ही भेट फक्त शैक्षणिकदृष्ट्याच होती की त्यामागे आणखी काही गणितं याचा लवकरच खुलासा होईल.
First Published: Monday, December 19, 2011, 11:42