Last Updated: Tuesday, December 20, 2011, 17:15
झी २४ तास वेब टीम, चंद्रपूर चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूर शेतशिवारातील एका विहरीत पूर्ण वाढीचा हा नर वाघाचा मृतदेह आढळला.
रविवारी रात्री ही घटना उघडकीस आली. वनविभागाने ग्रामस्थांच्या मदतीने वाघाचा मृतदेह बाहेर काढला. शिकारीच्या मागे धावताना काठडा नसलेल्या विहरीत पडून वाघ मृत पावल्याचे स्पष्ट झाले आहे. या विहरीत एक मुंगूसही आढळून आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
विना कठडा असलेल्या विहीरीत पडून वाघ मृत पावल्याची चंद्रपूरातली तिसरी घटना आहे. वरिष्ठ वनअधिकारी घटनेचा अधिक तपास करीत आहे.
First Published: Tuesday, December 20, 2011, 17:15