Last Updated: Tuesday, April 17, 2012, 08:44
मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात दुष्काळाने अक्षरश: कहर केला आहे. सातारा जिल्ह्यातल्या फलटण, कोरेगाव, खंडाळा आणि माण खटाव या तालुक्यांत सध्या पाण्यासाठी संघर्ष पेटलेला दिसतो आहे. पिण्यासाठी तर सोडाच पण या अवस्थेवर रडण्यासाठीही या ग्रामस्थांच्या डोळ्यात पाणी शिल्लक नाही.