सभागृहात केवळ आश्वासनांची खैरात - Marathi News 24taas.com

सभागृहात केवळ आश्वासनांची खैरात




झी २४ तास वेब टीम, नागपूर
 
विधीमंडळाच्या सभागृहात आश्वासनांची खैरात वाटली जाते मात्र मंत्री त्या आश्वासनांची पूर्ताताच करत नाहीत विधीमंडळाच्या आश्वासन समितीनच हा खुलासा केला आहे.
मात्र, आश्वासने मंय़त्र्यांनी दिली तरी त्याच्या पूर्ततेची जबाबदारी प्रशासकीय अधिक-यांची असते आणि ते ते पार पाडत नसल्याचं सांगण्यात आल आणि अशा अधिक-यांवर कारवाई केली जाईल, असही आश्वासन समितीने सांगितलं.पण मंत्र्यांची वेळ मारुन नेण्याची सवय आणि प्रशासकीय अधिका-यांचा बेजबाबदारपण याला कारणीभूत असल्याचं देवेद्र फडणवीस म्हणाले.
 
तसेच एखाद्या प्रश्नावर गोंधळ घालून बहुतेक सदस्य कामकाज होऊ देत नाहीत. त्यामुळे जनतेचा पैसा वाया जात असतो. आता तर विधिमंडळाच्या आश्वासन समितीनी ताशेरे ओढल्याने याला अधिक दुजोरा मिळाला आहे. आतातरी सदस्य या आश्वासन समितीचा सल्ला आचारणात आणील का, असा प्रश्न विचारण्यात येत आहे.

First Published: Wednesday, December 21, 2011, 06:36


comments powered by Disqus