Last Updated: Saturday, November 5, 2011, 13:28
झी २४ तास वेब टीम, नागपूर
नागपुरातील इतवारी बाजारपेठेत भीषण आग लागून लाखोंचं नुकसान झालयं. आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आलयं. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचं सांगण्यात येतय.

आग लागल्यानंतर घटनास्थळी तात्काळ 11 अग्निशमन दलाचे बंब दाखल झाले. मात्र आग भीषण असल्यानं आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाला शर्थीचे प्रयत्न करावे लागले. एका प्रत्यक्षदर्शीनं दिलेल्या माहितीनुसार एका दुकानाला पहिल्यांदा आग लागली. त्यानंतर ही आग पसरत गेली. आग परिसरातील इतर अनेक दुकानांमध्येही पसरली.
या आगीत कोणतीही जिवीतहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात वित्तहानी झालीय. अनेक दुकानं आगीत भस्मसात झालीयेत.
First Published: Saturday, November 5, 2011, 13:28