नगर ‘हॉरर’ किलिंग : नितीनला न्याय मिळणार?

Last Updated: Friday, May 2, 2014, 23:06

वेदनेनं तडफडत मेलेल्या नितीन आगेनं वरच्या जातीतल्या मुलीशी प्रेम करण्याचा गुन्हा केला होता. आपला जीव गमावून नितीननं आपल्या प्रेमाची किंमत चुकवली.

मुंबई कुणाची? महायुती आघाडीला सुरूंग लावणार?

Last Updated: Tuesday, April 22, 2014, 22:44

मुंबई कुणाची? याचा फैसला गुरूवारी होणाराय... मुंबईतील सहा मतदारसंघात उद्या गुरुवारी मतदान होतंय. 2009 च्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीने या सहाच्या सहा जागा जिंकल्या होत्या. आघाडी यंदाही ती किमया कायम राखणार की, महायुती आघाडीला सुरूंग लावणार, याची उत्सूकता शिगेला पोहोचलीय.

नागपूरमध्ये ५ वर्षीय चिमुकलीला बसनं चिरडलं

Last Updated: Wednesday, March 19, 2014, 14:57

नागपूरकर आज हळहळले... आग्याराम देवी चौकामध्ये आज एका चिमुकलीचा अपघातात मृत्यू झाला. आज सकाळी ही घटना घडली.

‘भाग मिल्खा भाग’ पूर्णपणे बनावट चित्रपट: नसीरुद्दीन शाह

Last Updated: Sunday, December 22, 2013, 10:46

ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांच्या मते ‘भाग मिल्खा भाग’ हा चित्रपट पूर्णपणे बनावट चित्रपट आहे. फरहाननं नक्कीच चित्रपटात स्वत:वर खूप मेहनत घेतलीय. मसल्स बनवणं, केस वाढवणं... पण तितका अभिनयाबाबत प्रयत्न करीत नाही, असंही नसीर म्हणाले.

दिवेआगर सुवर्ण गणेश मंदिराच्या पुनर्बांधणीसाठी परवानगी

Last Updated: Monday, October 28, 2013, 09:57

रायगड दिवेआगर इथलं सुवर्ण गणेश मंदिर नव्यानं बांधण्यासाठी अखेर मोक्का न्यायालयाची परवानगी मिळालीय. २४ मार्च २०१२ला या मंदिरावर दरोडा पडला होता. दरोडेखोरांनी एक किलो तीनशे पंचवीस ग्रॅम सोन्याचा गणेश मुखवटा आणि काही अलंकार लंपास केले होते. यावेळी २ पहारेकर्‍यांनाही ठार मारण्यात आलं होतं.

व्हिडिओ रेकॉर्डिंग करून दोन पत्नींच्या पतीची आत्महत्या!

Last Updated: Thursday, October 10, 2013, 14:08

दोन बायकांच्या कचाट्यात सापडलेल्या सुनिलनं चक्क व्हिडिओ रेकॉर्डिंग करत आत्महत्या केली... आणि आपल्या मुलाचा छताला लटकलेला मृतदेह पाहून सुनिलच्या आईच्या पायाखालची जमीनच सरकली. ही हृदयद्रावक घडना मुंबईत घडलीय.

रागिनी MMS-२ मध्ये सनी लिऑनची धूम!

Last Updated: Tuesday, September 10, 2013, 14:07

पॉर्नस्टार सनी लिऑन सध्या खूप मेहनत घेतांना दिसतेय. आता ती रागिनी MMS-२मध्ये आपला जलवा दाखवणार आहे. बॉलिवूडमधला सनी लिऑनचा पहिला चित्रपट म्हणजे जिस्म-२, पण तो फ्लॉप ठरला. मात्र त्यानंतर आलेलं शूट आऊट अॅट वडालामधलं तिचं अॅटम साँग चांगलंच गाजलं.

‘भाग मिल्खा भाग’ टॅक्स फ्री कराः फरहान

Last Updated: Wednesday, July 17, 2013, 21:21

भाग मिल्खा भाग सिनेमा टॅक्सफ्री करावा अशी मागणी निर्माता-अभिनेता फरहान अख्तर आणि दिग्दर्शक राकेश मेहरा यांनी केलीये.

`भाग मिल्खा भाग` पाहून कार्ल लुईस हेलावला

Last Updated: Tuesday, July 16, 2013, 20:24

मिल्खा सिंगच्या जीवनावर बनविण्यात आलेला `भाग मिल्खा भाग` हा चित्रपट भारतातच नाही, तर जगभरात प्रसिद्ध होत आहे. अमेरिकेचा जगप्रसिद्ध धावपटू कार्ल लुईस हा चित्रपट पाहून प्रभावित झाला आणि त्याने चक्क मिल्खा सिंग यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे.

...आणि मिल्खा सिंग ओक्साबोक्सी रडलेत

Last Updated: Friday, July 12, 2013, 13:11

फराह अख्तर याच्या ‘भाग मिल्खा भाग’ या चित्रपटाने कमाल केली. रूपेरी पडद्यावरील मिल्खाने वास्तवात भारतीय धावपटू मिल्खा सिंग यांना रडविले. या सिनेमातील काही दृश्य पाहून मिल्खा सिंग ओक्साबोक्सी रडलेत.

ट्रेलर पाहा : फरहानचा ‘मिल्खा’ अवतार

Last Updated: Thursday, June 20, 2013, 16:09

फरहान खानच्या आगामी ‘भाग मिल्खा भाग’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लॉन्च करण्यात आलाय. वेबसाईटवर लॉन्च झालेल्या या व्हिडिओनं यू ट्यूबवर एकच धम्माल उडवून दिलीय.

अखेर ‘अग्नी-२’ची चाचणी यशस्वी

Last Updated: Tuesday, April 9, 2013, 15:51

ओडिसा इथं नुकतीच ‘अग्नी-२ स्ट्रेजिक बैलिस्टिक’ या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली. भुवनेश्वरपासून साधारण २०० किलोमीटर अंतरावर भद्रक जिल्ह्यामध्ये ही चाचणी घेण्यात आली.

हॉट साशा आगाचा पहिल्याच सिनेमात जलवा

Last Updated: Friday, April 5, 2013, 21:21

अभिनेत्री सलमा आगा हीची मुलगी साशा आगा ही बॉलिवूडमध्ये पदार्पण करते आहे. औरंगजेब या सिनेमातून साशा तिच्या करिअरची सुरवात करीत आहे.

दुष्काळातून बाहेर काढ, राणेंचं भराडीदेवीला साकडं

Last Updated: Thursday, February 14, 2013, 18:16

आपलं जे राजकीय यश आहे, ते भराडी देवीच्या आशिर्वादामुळे आहे, असं उद्योगमंत्री नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

`मोहन प्यारे` पुन्हा जागा झाला

Last Updated: Sunday, January 27, 2013, 16:36

ज्या नाटकाने सिद्धार्थ जाधव याला एक ओळख दिली ते नाटक म्हणजे ‘जागो मोहन प्यारे’. तब्बल दीड वर्षानं हे नाटक पुन्हा रंगभूमीवर आलं.. पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये एकाच दिवशी तीन प्रयोग करत सिद्धार्थ जाधव आणि त्याच्या टीमने जोरदार पुनरागमन केल.

नाशिकमध्ये सेनेत हलचल, बागुल राष्ट्रवादीत

Last Updated: Monday, January 14, 2013, 21:34

नाशिकमधील शिवसेनेचे माजी आमदार आणि माजी जिल्हाप्रमुख सुनील बागुल राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. मुंबईत त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची शक्यता आहे.

मंत्रालयाचं काही खरं नाही....

Last Updated: Tuesday, June 26, 2012, 22:30

मंत्रालयाला लागलेल्या आगीत सुमारे 5 लाख 86 हजार फाईल्स आणि साडे सोळा लाख इतर दस्तावेज जळाल्यात. त्यामध्ये अनेक महत्त्वाच्या आणि गोपनिय फाईल्स तसंच इतर दस्ताऐवजांचा समावेश आहे.

आघाडी सरकारमुळे शेतकऱ्यांचा जीव जाणार ?

Last Updated: Tuesday, June 5, 2012, 16:14

काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये सुरु असलेल्या शह-काटशहाचा फटका राज्यातील जिल्हा बँकांना आणि पर्यायानं शेतकऱ्यांना बसू लागला. त्यामुळे ऐन पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्यांना पीककर्ज मिळत नसल्यानं शेतकरी अडचणीत सापडला आहे.

विधानपरिषदेसाठी आघाडीत बिघाडी होणार?

Last Updated: Monday, May 7, 2012, 16:09

विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता आहे. परभणी-हिंगोली आणि नाशिक विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराविरोधात काँग्रेसनं उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

ग्रामसभा उधळली, बाप्पा राहिले अधांतरी...

Last Updated: Thursday, May 3, 2012, 16:42

दिवेआगरमध्ये नवीन गणेशमूर्तीच्या निर्णयासाठी बोलावण्यात आलेल्या ग्रामसभेत जोरदार गोँधळ झाला आहे. मंदिराचे विश्वस्त मंडळाचे सदस्य या ग्रामसभेला अनुपस्थित राहिले आहेत.

दिवेआगर मंदिरात बाप्पा होणार विराजमान?

Last Updated: Thursday, May 3, 2012, 10:18

रायगड जिल्ह्यातल्या दिवेआगर इथल्या सुवर्ण गणेश मंदिरातील गणेशमूर्तीप्रमाणेच हुबहुब चांदीची मूर्ती पुण्यातील सराफ जितेंद्र घोडके यांनी तयार केली आहे.

दिवेआगर चोरी : चोरांचा लागला छडा

Last Updated: Wednesday, April 25, 2012, 09:46

रायगड जिल्ह्यातील दिवेआगर सुवर्णगणेश चोरीप्रकरणाचा छडा लागला आहे. या प्रकरणी शहर गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने एका महिलेसह तिघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून गणेशमूर्तीचे अवशेष आणि दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.

रायगड दरोडा : दिवेआगर ग्रामस्थांचा मोर्चा

Last Updated: Saturday, April 7, 2012, 18:59

रायगड जिल्ह्यातील दिवेआगर इथल्या सुवर्ण गणेश मंदिरावर पडलेल्या दरोड्याला पंधरवडा उलटूनही पोलीस तपासात काहीच धागेदोरे न लागल्यानं संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी दिघीसागरी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला.

गणेशमूर्ती चोरी : ट्रस्टीच जबाबदार - गृहमंत्री

Last Updated: Thursday, April 5, 2012, 16:37

रायगड जिह्यातील दिवेआगारमधील सुवर्णगणेशमूर्तीच्या चोरीप्रकरणी गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी मंदिराच्या ट्रस्टीवर टीकास्त्र सोडल आहे. मूर्तीच्या सुरक्षिततेची जबाबदारी ट्रस्टींवर होती. मात्र ट्रस्टींनी सुरक्षेच्या नियमांचं पालन केलं नाही, अस सांगत आर.आर. पाटील यांनी ट्रस्टींवर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.

आघाडीत सारं काही आलबेल...

Last Updated: Tuesday, March 27, 2012, 08:55

जिल्हा परिषद अध्यक्षपदांच्या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीत बेबनाव निर्माण झाला असतानाच पुणे महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मात्र राष्ट्रवादीला काँग्रेसनं साथ दिली.

मनसेचा आघाडीला 'पाठिंबा', सेनेला मात्र 'ठेंगा'

Last Updated: Wednesday, March 21, 2012, 11:38

औरंगाबाद जिल्हा परिषदेतही मनसे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला पाठिंबा देणार आहे. एवढच नाही तर आघाडीसोबत सत्तेतही सहभागी होणार आहे. अध्यक्षपद काँग्रेसकडं, उपाध्यक्षपद राष्ट्रवादीकडं तर मनसेला दोन समित्या मिळणार आहेत.

सुहासिनी लोखंडे आघाडीत जाणार?

Last Updated: Sunday, March 4, 2012, 18:06

ठाण्याच्या भाजपच्या बेपत्ता नगरसेविका सुहासिनी लोखंडे या आघाडीच्या गोटात सामिल झाल्याची शक्यता वर्तवली जाते आहे. युतीचे ८० टक्के नगरसेवक आपल्या संपर्कात असल्याच्या जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यामुळं संशयाला बळ मिळालं आहे.

जाहीरनाम्यात आघाडीची चूक

Last Updated: Wednesday, February 8, 2012, 22:40

मुंबई महानगरपालिका निवडणुकीला काही दिवस बाकी असताना आज आघाडीच्या नेत्यांनी जाहीरनामा प्रसिद्ध केला. जाहीरनाम्यात मोठ्या प्रमाणात आश्वासन मुंबईकरांना दिली आहेत. मात्र काँग्रेस राष्ट्रवादीने छापलेल्या या जाहीरनाम्यात चुका देखील तितक्याच आहे.

आघाडीचा जाहीरनामा, कोणा कोणा येणार कामा?

Last Updated: Wednesday, February 8, 2012, 20:52

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर आज आघाडीने आपला जाहीरनामा जाहीर करण्यात आले. मुंबईतल्या २००० सालांपर्यंतच्या झोपड्यांना संरक्षण देण्याच्या घोषणेसह अनेक आश्वासनांची खैरात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या जाहीरनाम्यात करण्यात आली आहे.

नाशिकमध्ये महाआघाडी ?

Last Updated: Friday, January 27, 2012, 22:52

नाशिकमध्ये आघाडीची महाआघाडी होण्याची चिन्ह आहेत. आघीडीनं माकप, भाकप आणि भारीप बहुजन महासंघाला बरोबर घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मात्र त्यांना जागा देताना दोन्ही काँग्रेसची दमछाक होत आहे.

गोव्यात कुणाचंच काही खरं नाही....

Last Updated: Thursday, January 26, 2012, 18:11

गोव्यातील विधानसभा निवडणुकीत युती आणि आघाड्यांची घोषणा होण्यास उशीर झाला आहे. गोव्यासह उत्तर प्रदेशचीही विधानसभा निवडणूक होते आहे. उत्तर प्रदेश राजकीयदृष्ट्या महत्वाचं राज्य असल्यानं सर्वच पक्षांनी तिथं लक्ष केंद्रीत केल आहे.

आघाडीची गाडी रूळावर....

Last Updated: Saturday, January 21, 2012, 16:03

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी गेली अनेक दिवस सुरू असणाऱ्या आघाडी गाडी आज कुठे रूळावर आली आहे. आज मुंबईतला आघाडीचा वॉर्डवाटपाचा तिढा सुटला आहे. त्यानुसार आता वॉर्ड क्रमांक ५० , ५६ काँग्रेसला मिळाला आहे.

आघाडी झाली खरी, आमदार खासदार नाराज भारी

Last Updated: Wednesday, January 11, 2012, 15:39

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीत आघाडी झाली खरी मात्र आघाडीबाबत काँग्रेसमध्ये असंतोष पसरला आहे. मुंबईतल्या काँग्रेस खासदार आमदारांच्या बैठकीत राष्ट्रवादीला ४५ जागा देण्याचं ठरलं असताना ५८ जागा दिल्य़ाच कशा असा सवाल आमदार-खासदारांनी विचारला आहे.

रायगडाला जेव्हां जाग येते @ २३०१

Last Updated: Tuesday, November 1, 2011, 15:51

श्रेष्ठ नाटककार प्रा. वसंत कानेटकर यांच्या ‘रायगडाला जेव्हां जाग येते’ या ऐतिहासिक नाटकाला सामाजिकतेची जोड दिल्यानेच २३00वा प्रयोगापर्यंत टप्पा गाठता आहे.ज्येष्ठ रंगकर्मी व नाटकात ‘शिवाजी’ची भूमिका साकारणारे अविनाश देशमुख यांनी व्यक्त केलं.

नागपूर बाजारपेठेत भीषण आग

Last Updated: Saturday, November 5, 2011, 13:28

नागपुरातील इतवारी बाजारपेठेत भीषण आग लागून लाखोंचं नुकसान झालयं. आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आलयं.