Last Updated: Tuesday, October 25, 2011, 06:34
झी २४ तास वेब टीम, नागपूर उत्तर मुंबईचे काँग्रेसचे खासदार संजय निरुपम यांनी दिवाळीत राजकीय फटाके फोडले आहेत. उत्तर भारतीयांनी ठरवलं तर मुंबई ठप्प होईल, असं वक्तव्य नागपूरमधे केलंय. खासदार संजय निरूपम यांनी पुन्हा उत्तर भारतियांचा सूर आवळल्याने पुन्हा वादाला तोंड फोडले आहे.
मुंबई, महाराष्ट्राचा भार उत्तर भारतीयांच्या खांद्यावर आहे, असंही म्हटलंय. आम्हाला उखडण्याचा प्रयत्न केला तर स्वतःच उखडाल, असंही निरुपम म्हणाले. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर निरुपम यांनी उत्तर भारतीय राग आळवला आहे.
संजय निरुपम यांनी 'टीम अण्णां'चे सहकारी अरविंद केजरीवाल यांनाही इशारा दिलाय. काँग्रेसला टार्गेट करणं सुरुच ठेवलंत, तर देशभरात चपलांच्या प्रसादाला सामोरं जावं लागेल, असं निरुपमांनी म्हटलंय.
First Published: Tuesday, October 25, 2011, 06:34