Last Updated: Monday, November 7, 2011, 07:10
झी २४ तास वेब टीम, नागपूरनागपूर विमानतळावर बांधकाम विभागाच्या एका अभियंत्याला ४३ जिवंत काडतुसांसह अटक करण्यात आली आहे. कार्डो रिबा असं या अभियंत्याचं नाव असून तो अरुणाचल प्रदेशच्या बांधकाम विभागात सहाय्यक अभियंता म्हणून कार्यरत आहे. हा अभियंता नागपूरहून दिल्लीला जाणार होता. मात्र विमानतळावर तपासणीदरम्यान त्याच्याकडे काडतुसं असल्याचं आढळून आल्यानं पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. ही एवढी काडतुसं त्याच्याकडे आली कुठून आणि तो ही कशासाठी घेऊन चालला होता, या प्रश्नाचं उत्तर मात्र मिळू शकलेलं नाही.
First Published: Monday, November 7, 2011, 07:10