पुण्यात मोदी नमो नम:, गुजरात पोलिसांनी घेतला सुरक्षेचा आढावा

Last Updated: Friday, November 1, 2013, 11:23

गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते नरेंद्र मोदी यांच्या आजच्या पुणे दौ-याच्या पार्श्वभूमीवर पुण्यात चोख सुरक्षा ठेवण्यात आली आहे. पाटण्यातल्या बॉम्बस्फोटांच्या घटनेनंतर अतिरिक्त सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. दरम्यान, गुजरात पोलिसांनी घेतला सुरक्षेचा आढावा घेतला आहे.

राजकीय हिशेब...व्हीआयपी सुरक्षेचं गौडबंगाल

Last Updated: Friday, October 11, 2013, 10:32

राजकीय नेते आणि मंत्र्यांना दिलेल्या व्हीआयपी सुरक्षेला कात्री लावण्यात आली असताना, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सुरक्षेत मात्र काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारनं वाढ केली आहे. याउलट आघाडीशी काडीमोड घेऊन महायुतीत सामील झालेले रामदास आठवले यांची सुरक्षा मात्र कमी करण्यात आली आहे. यामागे काही राजकीय हिशेब आहेत का, याची चर्चा आता सुरू झाली आहे.

आयपीएल थकबाकी : राज्य सरकारला थप्पड!

Last Updated: Friday, March 15, 2013, 09:26

आयपीएलला पुरवलेल्या सुरक्षाव्यवस्थेचे पैसे वसूल करण्यात राज्य सरकारला अजून यश आलं नाही. त्यामुळेच महाराष्ट्र सरकारवर मुंबई हायकोर्टानं चांगलेच ताशेरे ओढलेत.

रिमांड होममधून चार अल्पवयीन मुली गायब

Last Updated: Tuesday, January 24, 2012, 21:26

औरंगाबादच्या रिमांड होममधून चार अल्पवयीन मुली गायब झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यापैकी दोन मुली सापडल्या आहेत. या मुली रिमांड होममधून पळून गेल्याचं निष्पन्न झालं आहे. १७ आणि १८ वर्ष वयाच्या या मुली आहेत.

बॉम्बशोधक पथकाची बोंब!

Last Updated: Wednesday, November 30, 2011, 18:30

बईत कुठं बॉम्बसदृश वस्तू असेल, वा बॉम्बचा निनावी फोन आला, तर बॉम्बशोधक पथक तातडीनं तिथं पोहोचेलच, याची कुठलीही शाश्वती देता येणार नाही. कारण सध्या बॉम्बशोधक विभागात केवळ तीनच पोलीस अधिकारी कार्यरत आहेत.

सीसीटीव्हीने होणार प्रत्येक चौक चौकस !

Last Updated: Tuesday, November 22, 2011, 13:52

नवी मुंबईच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिकेच्या परिसरातल्या प्रत्येक प्रवेशद्वार आणि सार्वजनिक चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत.या सुरक्षा व्यवस्थेसाठी पहिल्या टप्प्यात आठ कोटींचा खर्च करण्यात येणार आहे.

नागपूर विमानतळावर जिवंत काडतुसं!

Last Updated: Monday, November 7, 2011, 07:10

नागपूर विमानतळावर बांधकाम विभागाच्या एका अभियंत्याला ४३ जिवंत काडतुसाहसह अटक करण्यात आली आहे. कार्डो रिबा असं या अभियंत्याचं नाव असून तो अरुणाचल प्रदेशच्या बांधकाम विभागात सहाय्यक अभियंता म्हणून कार्यरत आहे.