Last Updated: Monday, February 27, 2012, 19:07
www.24taas.com, नागपूर नागपुरात बहुजन समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष विलास गरुड यांना मारहाण करण्यात आलीये. बसपाच्या कार्यकर्त्यांनीच गरुड यांना मारहाण केलीये. महापालिका निवडणुकीत तिकीट विकल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे.
विलास गरुड यांच्या हस्ते नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात घुसून बसपाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण केली. गरुड यांना झेंड्य़ाच्या काठ्यांनी मारहाण करण्यात आली. मारहाण करणा-या कार्यकर्त्यांमध्ये महिलांचा समावेश होता. सभागृहात सुरु झालेल्या राड्यानंतर एकच गोंधळ उडाला होता.
First Published: Monday, February 27, 2012, 19:07