Last Updated: Tuesday, February 28, 2012, 19:24
www.24taas.com, यवतमाळयवतमाळ जिल्ह्यातील वणी नगरपरिषदेत मनसे आणि अपक्ष नगरसेवकांत हाणामारी झाली असून नगरसेवकांनी खुर्च्याची फेकाफेक केल्याने दोन नगरसेविका जखमी झाल्या आहेत.
वणी नगरपरिषदेची आज सर्वसाधारण सभा होती. या सभेत नगरपरिषेदेच्या गाळे लिलावावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये बाचाबाची झाली. वणी शहरात नगरपालिकेच्या मालकीच्या दुकानांचा लिलाव योग्य पद्धतीने झाला नाही, असा आरोप विरोधकांनी केला. यावर चर्चा करण्याची मागणी विरोधकांनी केली होती. मात्र, विरोधकांच्या या मागणीला धुडाकवून सभेचे कामकाज पुढे सुरू ठेवले. यामुळे संतप्त विरोधकांनी घोषणाबाजी सुरू केली. त्यानंतर सभागृहात असलेल्या खुर्च्या एकमेकांवर भिरकवायला सुरूवात केली. या हाणामारीत दोन नगरसेविका जखमी झाल्या.
हाणामारी आणि खुर्च्यांची फेकाफेकी यामुळे मनसे आणि अपक्ष प्रत्येकी दोन नगरसेवकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
First Published: Tuesday, February 28, 2012, 19:24