रायगडमध्ये तटकरे विरूद्ध तटकरे, घड्याळ विरुद्ध घड्याळ!

Last Updated: Wednesday, April 9, 2014, 16:51

रायगडमध्ये तटकरे विरूद्ध तटकरे अशी एक रंगतदार लढत रंगणार आहे. या मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप आणि शिवसेना अशी तिरंगी लढत रंगणार आहे. मात्र अगदी शेवटच्या क्षणाला अपक्ष म्हणून सुनील शाम तटकरे या नावाच्या व्यक्तीनंही उमेदवारी अर्ज दाखल केलाय. सुनील तटकरे यांच्याशी असलेल्या नामसाधर्म्यामुळे इथं एक वेगळीच रंगत निर्माण केलीय.

अपक्ष आमदारांचा सरकारला इशारा

Last Updated: Wednesday, September 26, 2012, 11:24

अपक्ष आमदार वेगळ्या पवित्र्यात आहेत. अजित पवार असतील तरच राज्य सरकारला पाठिंबा देऊ असा आक्रमक पवित्रा अपक्ष आमदारांनी घेतलाय. अन्यथा सरकारला दिलेल्या पाठिंब्याबाबत पुनर्विचार करु असा इशारा अपक्ष आमदारांनी दिलाय.

पालिकेत हाणामारी, मनसे नगरसेवकांवर गुन्हा

Last Updated: Tuesday, February 28, 2012, 19:24

यवतमाळ जिल्ह्यातील वणी नगरपरिषदेत मनसे आणि अपक्ष नगरसेवकांत हाणामारी झाली असून नगरसेवकांनी खुर्च्याची फेकाफेक केल्याने दोन नगरसेविका जखमी झाल्या आहेत.

नाशकात सत्तेसाठी अपक्षांना भाव

Last Updated: Wednesday, February 22, 2012, 10:32

नाशिक महापालिकेच्या निकालानंतर आता सगळ्याच पक्षांच्या गणितज्ज्ञांनी आकडेमोड करायला सुरुवात केलीय. या सर्वांच्या केंद्रस्थानी अपक्ष आणि छोटे पक्ष आहेत. अपक्षांच्या मदतीशिवाय सत्ता स्थापन करणं शक्यच नसल्यामुळं अपक्षांचा भाव भलताच वाढलाय.तर नाशिकमध्ये सत्तास्थापनेचे संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी दिलेत.