Last Updated: Thursday, March 8, 2012, 08:57
www.24taas.com, नागपूर होळीनिमित्त मध्य प्रदेशातून तस्करी करून राज्यात आणला जाणारा विदेशी दारूचा मोठा साठा नागपूरच्या उत्पादन शुल्क विभागानं जप्त केला आहे.
होळीमध्ये मोठ्या प्रमाणात मद्यसेवन होत असल्यानं ही तस्करी होत असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. मद्य तस्करी प्रकरणी अमोल बोरकर या आरोपीला अटक करण्यात आली असून मध्य प्रदेशच्या सीमेवर तपास मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे.
उत्पादन शुल्क विभागानं विदेशी मद्याच्या जवळजवळ ८७ पेट्या जप्त केल्या आहेत. नागपूरच्या ग्रामीण भागांतील बारमध्ये या मद्याची विक्री केली जात होती.
First Published: Thursday, March 8, 2012, 08:57