Last Updated: Saturday, March 17, 2012, 16:28
www.24taas.com, नागपूर ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने विरोध केला आहे. अशाप्रकारे ‘लिव्ह इन रिलेशन’ मानव संस्कृतीविरोधात असून समाजासाठी घातक असल्याचे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय सहकार्यवाहक दत्तात्रय होसबले यांनी व्यक्त केलंय.
‘लिव्ह इन रिलेशनशिप’ परस्पर विश्वासावर आघात असल्याचंही त्यांनी म्हटलंय. त्याऐवजी कौटुंबिक संबंधातील संस्कार देत जीवन कसं जगता येईल याचा विचार करणं आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलंय.
‘लिव्ह रिलेशनशिप’ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघच नाहीतर इतर काही धार्मिक संघटनांनीसुद्धा विरोध केल्याची आठवण त्यांनी करुन दिली. नागपूरमध्ये सुरु झालेल्या संघाच्या तीन दिवसीय अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत होसबले बोलत होते.
First Published: Saturday, March 17, 2012, 16:28