Last Updated: Thursday, November 10, 2011, 12:21
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी आपला काहीही संबंध नसल्याचं ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सांगितलंय. अण्णा संघाच्या कार्यक्रमाला हजर राहत असल्याचं वक्तव्य काल कोलकत्यामध्ये सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं होतं. त्यावर अण्णांनी हे स्पष्टीकरण दिलंय.