Last Updated: Monday, April 16, 2012, 10:51
www.24taas.com, मुंबईराज्यातील पाच महापा

लिकांच्या निवडणुकांचे निकाल आज हाती येणार आहेत. लातूर महापालिकेच्या मतमोजणीला सुरूवात झाली असून मालेगाव, परभणी आणि भिवंडी यांची मतमोजणी सकाळी ९ वाजता सुरू होणार आहे. तर चंद्रपुरात मतमोजणीला सकाळी १० वाजता सुरूवात होईल, अशी माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली आहे.
राज्यातील लातूर, परभणी, मालेगाव, भिवंडी आणि चंद्रपूर या महापालिकांसाठी रविवारी मतदान झाले.दरम्यान, काल पाच महापालिकांसाठीचं मतदान आज शांततेत पार पडलं..भिवंडीत ५१.३७ टक्के, लातूरात ५८ टक्के, परभणीत ५६.६६ टक्के तर मालेगावात ६३.११ टक्के मतदान झालं.
मालेगावात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेल्या जाहीर सभेनंतर या ठिकाणी काय निकाल लागतो, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. तसेच भिवंडीत अबू आझमी काय प्रभाव पाडणार याकडे सर्व राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. भिवंडीमध्ये शिवसेनाही सत्तेसाठी प्रबळ दावेदार म्हणून उभा ठाकला आहे.
व्हिसलिंग वुड्स, आदर्श अशा अनेक वादांच्या मुद्द्यानंतर माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची प्रतिष्ठा लातूर महापालिकेच्या निमित्ताने पणाला लागली आहे.
First Published: Monday, April 16, 2012, 10:51