नक्षलवादी अफवा पसरवतायेत- आबा - Marathi News 24taas.com

नक्षलवादी अफवा पसरवतायेत- आबा

www.24taas.com, गडचिरोली
 
जनतेत दहशत निर्माण करण्यासाठी नक्षलवादी अफवा पसरवत असल्याचा दावा गृहमंत्र्यांनी केला आहे. गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी ३ लोकप्रतिनिधींसह १२ कार्यकर्त्यांचे अपहरण केलं.
 
अशा बातम्या नक्षलवाद्यांनी जाणीवपूर्वक पसरवल्या आहेत. असा दावा गृहमंत्री आर आर पाटील यांनी 'झी २४ तास'शी बोलताना केला आहे. तसेच राजकीय नेत्यांचे अपहरण झालं आहे अशा प्रकारच्या अफवा पसरवल्या गेल्या आहेत.
 
या पसरवण्यात येणाऱ्या बातम्या म्हणजे अपहरण असल्याचा दावा  जनतेत भीती पसरवण्यासाठी नक्षल्यांनी या अफवा पसरवल्याचा त्यांनी सांगितलं. त्यामुळे या नक्की अफवा आहेत की खऱ्या बातम्या आहेत का याबाबत मात्र नागरिकांमध्ये संभ्रम आहे.
 
 
 
 
 
 
 

First Published: Tuesday, May 1, 2012, 23:05


comments powered by Disqus