Last Updated: Monday, November 28, 2011, 14:51
झी २४ तास वेब टीम, गडचिरोली 
गडचिरोली जिल्ह्यात कुरखेडा तालुक्यातल्या मालेवाडा गावाची ग्रामपंचायत नक्षलवाद्यांनी जाळून टाकली. सुमारे ६० ते ७० नक्षलवादी एकत्र येऊन त्यांनी ग्रामपंचायतीचं कुलूप तोडलं. तिथली तोडफोड केली. आणि त्यानंतर रॉकेल टाकून ग्रामपंचायतीमधली सरकारी कागदपत्र जाळून टाकली.
माओवादी नेता किशनजीच्या हत्येच्या निषेधार्थ हे कृत्य केल्याचं बॅनर ग्रामपंचायतीच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आलं होतं. या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक वीरेश प्रभू यांनी घटनास्थळी भेट दिली. नक्षलवाद्यांनी गडचिरोली, चंद्रपूर, गोंदियासह महाराष्ट्र बंदचं आवाहन केलं. तर नक्षलवाद्यांच्या या कृत्यामुळं परिसरातल्या ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. त्यामुळं पोलिसांनी बंदोबस्त वाढवला.
First Published: Monday, November 28, 2011, 14:51