आता ऑनलाईन मिळवा ग्रामपंचायतीचे दाखले

Last Updated: Thursday, January 23, 2014, 15:34

सर्व ग्रामीण भागातल्या नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता कोणालाही ग्रामसेवकाच्या मागं-पुढं फिरण्याची वेळ येणार नाही. कारण आता ऑनलाईन अर्ज भरून अगदी नाममात्र दरात ग्रामपंचायतीचा दाखला मिळवता येणार आहे. आपण ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर काही निश्‍चित वेळेनंतर अपेक्षित दाखल्याची प्रिंट आता काढता येणार आहे किंवा ई-मेलवर त्याची कॉपी पाठवली जाईल.

लोहा नगरपालिकेनंतर ३ ग्रामपंचायतींवरही मनसेचं वर्चस्व

Last Updated: Tuesday, October 29, 2013, 11:37

शहापूर तालुक्यातील तीन ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा २७ ऑक्टोबरला निकाल लागला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं इथंही मुसंडी मारलीय. मनसे पॅनलचे सदस्य तिन्ही ग्रामपंचायतीमध्ये विजयी झाले आहेत. गोठेघर, वाफे आणि खुटघर ग्रामपंचायतींवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं वर्चस्व प्रस्तापित केलंय.

माजी सरपंचाच्या हत्येत सतेज पाटील अडकणार?

Last Updated: Thursday, February 14, 2013, 11:34

कोल्हापुरात बुधवारी दुपारी झालेल्या पाचगावचे माजी सरपंच अशोक पाटील यांच्या हत्येप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आलीय.

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी हेलिकॉप्टर

Last Updated: Tuesday, November 27, 2012, 07:44

ग्रामपंचायत निवडणूकांमध्ये आता हेलिकॉप्टरचा वापर सुरु झालाय. ऐकून आर्श्चय वाटवं असेल... पण हे खरं आहे. नाशिक जिल्ह्यातल्या मुंढे गाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत हेलिकॉप्टरचा वापर झालाय. दरम्यान, ही सफर घडवून आणणाऱे चंद्रकांत गतीर हे बिनविरोध सरपंच झालेत.

कायद्याच्या आबाचा ढोल!

Last Updated: Wednesday, July 11, 2012, 14:36

बातमी पुण्याजवळच्या केशवनगरमधल्या अजब कारभाराची... या गावातल्या अनधिकृत बांधकामांना परवानगी दिल्यानं ग्रामपंचायतींच्या पाच सदस्यांवर निवडणूक लढवण्याची बंदी घातली. तरी हे पाचही जण निवडणूक लढले आणि जिंकलेसुद्धा... कायद्यांची ऐशीतैशी कशी होते आणि भ्रष्टाचारीच पुन्हा कशी सत्ता गाजवतात, याची ही गोष्ट...

राष्ट्रवादीने केली तिकोंडी गावाची कोंडी

Last Updated: Friday, February 24, 2012, 18:53

सांगली जिल्ह्यातील तीकोंडी या गावामधील ग्रामस्थांनी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान करण्याऐवजी काँग्रेसला मतदान केले. राष्ट्रवादीने काँग्रेसने या गोष्टीचा चांगलाच सूड उगवायला सुरूवात केली आहे.

नक्षलवाद्यांनी जाळली ग्रामपंचायत

Last Updated: Monday, November 28, 2011, 14:51

गडचिरोली जिल्ह्यात कुरखेडा तालुक्यातल्या मालेवाडा गावाची ग्रामपंचायत नक्षलवाद्यांनी जाळून टाकली. सुमारे ६० ते ७० नक्षलवादी एकत्र येऊन त्यांनी ग्रामपंचायतीचं कुलूप तोडलं. तिथली तोडफोड केली.