Last Updated: Tuesday, May 8, 2012, 21:41
www.24taas.com, गडचिरोली गडचिरोली जिल्ह्यात एका भाजीविक्रेत्या महिलेवर सामूहिक बलात्कार करुन तिची निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय.
सिरोंचा तालुक्यातील लक्ष्मीदेवपेठा या गावी राहणा-या मलक्का श्रीनिवास आदे ही महिला भाजीपाला विकून सिरोंचाहून गावाकडे परतत असताना वाटेत काही अज्ञात इसमांनी तिचे अपहरण करत तिला मुख्य रस्त्यापासून सुमारे २ किमी घनदाट जंगलात नेत तिच्यावर अमानुष बलात्कार केला आणि तिचा खून केला. मृत्यूनंतरही तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची बाब वैद्यकीय अहवालात स्पष्ट झाली आहे. हत्येनंतर महिलेचे नराधमांनी डोळे फोडले आणि महिलेचे शव जंगलातच टाकून पळ काढला.
या भागात तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेलेल्या मजुरांना महिलेचे शव दिसले. महिलेच्या मृत्यूमुळे तिची ३ छोटी मुलं अनाथ झाली आहे. पोलिसांनी मात्र या संपूर्ण प्रकरणावर मौन साधले असून अजून आरोपींना पकडण्यात पोलिसांना अपयश आले आहे.
First Published: Tuesday, May 8, 2012, 21:41