वेगळ्या विदर्भासाठी मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात गोंधळ, Separate Vidarbha announced CM program

वेगळ्या विदर्भासाठी मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात गोंधळ

वेगळ्या विदर्भासाठी मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात गोंधळ
www.24taas.com, झी मीडिया, नागपूर

वेगळ्या विदर्भाच्या मागणी करत पुन्हा एकदा आंदोलन सुरु झाले असतानाच आज मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात देखील विदर्भवाद्यांनी गोंधळ घातला. यावेळी उपस्थितांनी जोरदार घोषणाबाजी केली.

इंफोसिस कंपनीच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाच्या दरम्यान हा गोंधळ झाला. कार्यक्रमात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे भाषण संपल्यानंतर भूमिपूजन होत असताना तिथे उपस्थित असलेल्या विदर्भवादी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. माजी राज्यमंत्री सुलेखा कुंभारे आणि अहमद कदर यांच्या नेतृत्वात घोषणाबाजी केली.

आंदोलन करणाऱ्या सुमारे १५-२० आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तेलंगणा राज्याच्या मार्ग मोकळा झाल्यापासून वेगळ्या राज्याच्या निर्मिती करता विदर्भात देखील आंदोलन सुरु झाले आहे. येत्या काही दिवसात या सारखे आणखी काही आंदोलन झाले तर आश्चर्य नाही.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, February 22, 2014, 19:24


comments powered by Disqus