नगरमध्ये प्रेम प्रकरणातून १२वीच्या विद्यार्थ्याची हत्या, 12th Std Student Killed In Ahemadnagar

नगरमध्ये प्रेम प्रकरणातून १२वीच्या विद्यार्थ्याची हत्या

नगरमध्ये प्रेम प्रकरणातून १२वीच्या विद्यार्थ्याची हत्या
www.24taas.com, झी मीडिया, अहमदनगर

अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड येथे धक्कादायक घटना घडली आहे. प्रेम प्रकरणातून १२वीच्या विद्यार्थ्याची हत्या करण्यात आली आहे. शाळेत गळा आवळून गावातील एका झाडाला तरुणाला लटकवल्याचा धक्कादाय प्रकार उघड झाला. या हत्या प्रकरणी तिघांवर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुलीच्या भावाने प्रेमसंबंधातून नितीन आगे या विद्यार्थ्याची हत्या केल्याचा गंभीर प्रकार सोमवारी खर्डा येथे घडला. या युवकाला जबर मारहाण करून हत्या करण्यात आली. त्यानंतर आत्महत्येचा बनाव रचत मृतदेह निर्जनस्थळी झाडाला लटकविण्यात आला. पोलिसांनी यातील तीन आरोपींना अटक केली आहे. दरम्यान, घटनेच्या निषेधार्थ खर्डा आणि जामखेडमध्ये मंगळवारी बंद पाळण्यात आला.

खर्डा येथील स्कूलमध्ये इयत्ता बारावीत शिकणारा नितीन आगे आईवडिलांचा एकुलता होता. त्याचे एका मुलीबरोबर प्रेमसंबंध होते. हे मुलीच्या कुटुंबीयांना कळल्याने त्यांचा नितीनवर राग होता. २८ एप्रिल रोजी सकाळी साडेसात वाजता नितीन तासाला गेला होता. त्याचवेळी आबा हौसराव गोलेकर (२१), शेषराव रावसाहेब येवले (४२) आणि आकाश अरुण सुर्वे आदींनी विद्यालयात जाऊन नितीनला मारहाण केली.

नितीन घरी न आल्याने राजू आगे यांनी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास त्याची शोधाशोध सुरू केली. दरम्यान, खर्डा शिवारातील एका झाडाला नितीनचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. दरम्यान, नितीनला मारहाण करुन त्याचा दोरीने गळा आवळून खून झाल्याचा अहवाल जामखेडच्या सरकारी रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय मुंढे यांनी दिला. त्यानंतर नितीनचे वडील राजू आगे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.

पाहा व्हिडिओ


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, April 30, 2014, 09:21


comments powered by Disqus