Last Updated: Wednesday, February 19, 2014, 11:32
www.24taas.com, झी मीडिया, नाशिकनाशिकमध्ये शासकीय वात्सल्य महिला वसतिगृहातून १७ बारबाला पळून गेल्या आहेत. यातील ५ मुलींचा शोध घेण्यात यश आलं आहे.
सकाळी चारच्या सुमारास सुरक्षारक्षकाच्या डोळ्यात मिरचीपूड फेकून या १७ बारबालांनी धूम ठोकली.
ठाण्यामध्ये 28 नोव्हेंबरला डायघर शिळ भागातील एस फोर नावाच्या बारमध्ये मुंबई पोलिसांनी धाड टाकून ४१ मुलींना पकडलं होतं.
ठाण्यातील नाशिकच्या वात्सल्य वसतिगृहात या मुलींची रवानगी करण्यात आली होती, त्यापैकी 17 मुली गायब झाल्या.
यातील ५ मुलींना शोधण्यात यश आलं असून, आणखी १२ फरार मुलींना शोधण्याचं काम सुरू आहे, त्यासाठी संपूर्ण यंत्रणा कामाला लागली आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, February 19, 2014, 11:32