Last Updated: Wednesday, August 15, 2012, 09:41
www.24taas.com, नाशिकनाशिक जिल्ह्यातल्या कळवण तहसील कार्यालयानं स्वातंत्र्यादिनाच्या पार्श्वभूमीवर अकलेचे धिंडवडे काढले आहेत. तहसील कार्यालयानं शासकीय ध्वजारोहणाच्या निमंत्रण पत्रिकेवर हा घोळ घातलाय.
15 ऑगस्टला भारतीय स्वातंत्र्य दिनाऐवजी प्रजासत्ताक दिन म्हणण्याचा प्रताप केलाय, नाशिक जिल्ह्यातल्या कळवण तहसील कार्यालयानं..... शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवर 15 ऑगस्टचा, स्वातंत्र्यदिन असा उल्लेख करण्याऐवजी चक्क प्रजासत्ताक दिन असं छापत अकलेचे धिंडवडे काढलेत. या निमंत्रण पत्रिका तालुक्यातील मान्यवरांना वितरीतही करण्यात आल्या. पण या निमंत्रण पत्रिका ज्यांना मिळाल्या त्यांना हे पाहून आश्चर्याचा धक्काच बसला. मात्र चूक लक्षात येताच तहसील कार्यालयानं तोंड वर करुन चुकीची अशी सारवासारव केली.
अनेक मान्यवरांना मात्र चुकीच्याच निमंत्रण पत्रिका मिळाल्या आणि जायची तेवढी लाज गेलीच. मात्र ही अक्षम्य चूक असल्याच्या प्रतिक्रियाही उमटल्या. कळवण तहसील कार्यालयाने स्वातंत्र्यदिनाला प्रजासत्ताक दिन म्हणावं यापेक्षा दुर्भाग्यपूर्ण काय असेल. पुरोगामी म्हणवणा-या महाराष्ट्रात कळवणमधे घडलेला हा प्रकार लाजिरवाणा आहे.
First Published: Wednesday, August 15, 2012, 09:41