६४वा मराठवाडा मुक्तिदिन

Last Updated: Monday, September 17, 2012, 15:51

आज 64 वा मराठवाडा मुक्तीदिन सोहळा साजरा कऱण्यात येतोय. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत औरंगाबादेत हा सोहळा पार पडला. हैदराबादच्या निजामाच्या क्रूर राजवटीतून मुक्तीसाठी शेकडो जणांनी आपल्या प्राणांची आहूती दिली. या हुतात्म्यांना मुख्यमंत्र्यांनी अभिवादन केलं.

सुनीताने भारतीयांना दिल्या अंतराळातून शुभेच्छा

Last Updated: Wednesday, August 15, 2012, 13:06

भारतीय-अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स हिने आंतराळात भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा केला. इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर भारतीय ध्वज फडकावून सुनीताने भारतीयांना ६६व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. अंतराळात अशा पद्धतीने पहिल्यांदाच भारताचा स्वातंत्र्यदिन साजरा होत आहे.

तहसील कार्यालयाच्या अकलेचे धिंडवडे

Last Updated: Wednesday, August 15, 2012, 09:41

नाशिक जिल्ह्यातल्या कळवण तहसील कार्यालयानं स्वातंत्र्यादिनाच्या पार्श्वभूमीवर अकलेचे धिंडवडे काढले आहेत. तहसील कार्यालयानं शासकीय ध्वजारोहणाच्या निमंत्रण पत्रिकेवर हा घोळ घातलाय.