पिंपळगावात गावकऱ्यांच्या पुढाकाराने ५४ सीसीटीव्ही! 54 CCTVs in Pimpalgaon

पिंपळगावात गावकऱ्यांच्या पुढाकाराने ५४ सीसीटीव्ही!

पिंपळगावात गावकऱ्यांच्या पुढाकाराने ५४ सीसीटीव्ही!
www.24taas.com, झी मीडिया, नाशिक

देशातील सर्वात मोठे कांदा खरेदी विक्रीचे आगर असलेल्या नाशिक जिल्ह्यातील पिपळगावात तब्बल ५४ सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. विशेष म्हणजे ग्रामपालिका असलेल्या या गावाने पुढाकार घेत कायदा व सुव्यवस्था चोख केली आहे.

नाशिक जिल्ह्यातलं पिंपळगाव हे पंधरा ते वीस हजार लोकवस्तीचं गाव.. गेल्या काही महिन्यांत या गावात अपहरणासारखे प्रकार घडल्यानं ग्रामस्थांमध्ये दहशतीचं वातावरण आहे. पण आता सुरक्षेच्या दृष्टीनं गावात ५४ सीसीटीव्ही बसवण्यात आलेत. विशेष म्हणजे ग्रामपंचायतीच्या पुढाकारानं हे पाऊल उचलण्यात आलंय.

पिंपळगाव ही कांद्याची मोठी बाजारपेठ असल्यानं परप्रांतातून शेकडो ट्रक आणि अनोळखी माणसं या गावात येतात. आता संपूर्ण गावातल्या चौकांचे सुरक्षा नियंत्रण थेट पोलीस स्टेशनमधून होणार आहे. पोलीस अधीक्षकांनीही ग्रामपालिकेच्या उस्फुर्त सहभागाचं स्वागत केलंय.

राज्यातल्या मोठमोठ्या शहरांत सीसीटीव्ही बसवण्याच्या नुसत्याच घोषणा करण्यात आल्या. पण पिंपळगावसारख्या ग्रामपंचायतीनं सीसीटीव्हीची योजना तडीस नेली. या गावाचा आदर्श घेत राज्यात इतर ठिकाणीही लवकर सीसीटीव्ही लागतील, अशी अपेक्षा आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Wednesday, August 21, 2013, 19:55


comments powered by Disqus