अबू जिंदालचा अर्ज फेटाळला, abu jindal application rejected

अबू जिंदालचा अर्ज फेटाळला

अबू जिंदालचा अर्ज फेटाळला

www.24taas.com, नाशिक
नाशिक शहरातील महत्वाच्या ठिकाणची रेकी करून घातपात घडविण्याच्या प्रयत्नात असल्याच्या खटल्यातून दोषमुक्त करण्याचा आंतरराष्ट्रीय दहशदवादी अबू जिंदालचा अर्ज नाशिकच्या विशेष कोर्टाने फेटाळून लावलाय.

लालाबाबा, हिमायत बेग यांच्याशी संगनमत करून नाशिक शहरातील पोलीस आयुक्तालय, महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी आणि आर्टिलरी सेंटर इथं घातपात घडविण्याचं कारस्थान रचल्याचे आरोप जिंदालवर ठेवण्यात आलेत.

या प्रकरणी पुढील सुनवणी २,३,४ मे ला नाशिकच्या कोर्टात होणार असून त्यावेळी अबूला हजर करण्याचे आदेश देण्यात आलेत. १६ एप्रिलला सरकारी आणि बचाव पक्षाच्या वतीन सुमारे तीन साडेतीन तास युक्तिवाद करण्यात आला होता.. त्यावरचा निकाल आज न्यायलयाने दिलाय.

First Published: Monday, April 22, 2013, 17:19


comments powered by Disqus