`फ्लायओव्हर`वर उद्घाटनाच्या दिवशीच अपघात, २ ठार, ACCIDENT ON FIRST DAY ON NASIK FLYOVER , 2 DEAD

`फ्लायओव्हर`वर उद्घाटनाच्या दिवशीच अपघात, २ ठार

`फ्लायओव्हर`वर उद्घाटनाच्या दिवशीच अपघात, २ ठार
www.24taas.com, झी मीडिया, नाशिक

नाशिकच्या उड्डाणपुलाचे शुक्रवारी उद्धघाटन झालं. वाहतुकीची समस्या थोडी कमी होईल म्हणून थोड्याफार सुखावलेल्या नाशिककरांच्या आनंदावर मात्र त्याच दिवशी विरजण पडलंय.

मुंबई-आग्रा महामार्गावरील नाशकातील उड्डाणपुलाचे केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन होताच तासाभराच्या आतच या पुलावर भीषण अपघात होऊन दोघेजण ठार झाले. मोटारसायकलची स्टंटबाजी करण्याच्या नादातच दोघा युवकांनी आपला प्राण गमावला, तर दोघेजण जखमी झाले. नाशिकहून मुंबईच्या दिशेने येणार्या आणि नाशिकहून पाथर्डीच्या दिशेने जाणार्याख बेफाम मोटारसायकलींची समोरासमोर जोरदार धडक झाली. हे दोन्ही मोटारसायकलस्वार सुसाट वेगाने जाताना स्टंटबाजी करीत होते, पण दोघांचाही गाडीवर ताबा सुटला आणि ते एकमेकांवर धडकले. यात दोन्ही मोटारसायकलस्वारांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर दोघेजण गंभीर जखमी झाले. हर्षल आणि फुलसिंग पवार अशी या अपघातामधील मृतांची नावं आहे. जखमींना उपचारासाठी सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे या उड्डाणपुलावर दुचाकी आणि तीनचाकी वाहनांना बंदी असल्याचे पोलीस आयुक्तांनी कालच जाहीर केले होते, पण या पुलावर आज पोलीस बंदोबस्त नसल्याने हे मोटारसायकलस्वार पुलावर घुसले आणि अपघात झाला. पोलीस व्हीआयपींच्या सुरक्षेत गुंतले होते. उद्घाटनाला आलेली नेतेमंडळी मुंबई नाक्यावर आयोजित केलेला लेसर शो पाहत असतानाच हा अपघात झाला.

पुलाच्या उद्घाटनाच्या सेलिब्रेशनमध्ये नाशिककर मग्न असतानाच झालेल्या अपघातामुळे नाशिककरांच्या उत्साहावर विरजन पडलं.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, June 15, 2013, 11:04


comments powered by Disqus