‘पीडब्ल्यूडी’मध्ये सगळेच भ्रष्टाचारी - चिखलीकर, all are corrupt in pwd, says chikhalikar

‘पीडब्ल्यूडी’मध्ये सगळेच भ्रष्टाचारी - चिखलीकर

‘पीडब्ल्यूडी’मध्ये सगळेच भ्रष्टाचारी - चिखलीकर
www.24taaas.com, झी मीडिया, नाशिक

‘सार्वजनिक बांधकाम विभागात केवळ मीच नाही तर सर्वच जण भ्रष्टाचारी आहेत’ असा दावा लाचखोर अभियंता सतिश चिखलीकर आणि जगदीश वाघ यांनी केलाय. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री छगन भुजबळ चक्क तोंडावर पडलेत.

सार्वजनिक बांधकाम विभागातील सर्वच जण भ्रष्टाचारी असल्याचा दावा लाचखोर सतीश चिखलीकर आणि जगदीश वाघ यांनी केलाय. यासंदर्भात एसीबीचे महासंचालक राज खिलनानी यांनी माहिती दिलीय. तसंच नाशिकमध्ये जगदीश वाघची पत्नीच ‘वन-एस’ कंपनीच्या नावानं सार्वजनिक बांधकाम ठेके घेत असल्याची माहितीही त्यांनी उघड केलीय.

लाच घेताना रंगेहाथ पकडल्यानंतर सतीश चिखलीकरकडे करोडोंची बेनामी संपत्ती सापडलीय. त्यामुळे चिखलीकरभोवती ‘अँन्टी करप्शन ब्युरो’ची पकड आता घट्ट होत चाललीय. आपली प्रचंड संपत्ती लपवण्यासाठी चिखलीकरने वापरलेले सर्व मार्ग एसीबी उध्वस्त करतेय. याच प्रकरणी बुधवारी नगर जिल्ह्यातील शेवगावमधील एका सहकारी बॅंकेवरही एसीबीनं छापा मारण्यात आला.. या छाप्यातून अनेक धागेदोरे समोर आल्याचं समजतंय. या प्रकरणी स्वाती चिखलीकरच्या लॉकर्सचीही कसून तपासणी करण्यात आली.

‘एका पीडब्लूडीच्या इंजिनिअरकडे एवढी संपत्ती असेल तर पीडब्लूडीच्या मंत्र्याकडे किती संपत्ती असेल? ’या राज ठाकरेंच्या प्रश्नाला उत्तर देताना छगन भुजबळ यांनी या प्रकरणाची संपूर्ण जबाबदारी ढकलली होती. परंतू, सार्वजनिक बांधकाम विभागात सर्वच जण भ्रष्टाचारी आहेत असा दावा चिखलीकरनं केल्यानं याची जबाबदारी भुजबळांची नसेल तर कुणाची आहे असा प्रश्न सर्वसामान्यांना पडलाय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, May 9, 2013, 10:07


comments powered by Disqus