पाणी प्रश्नावर `अमरीश पॅटर्न` Amarish Pattern for water supply

पाणी प्रश्नावर `अमरीश पॅटर्न`

पाणी प्रश्नावर `अमरीश पॅटर्न`
www.24taas.com, नाशिक

कोट्यावधींची उधळपट्टी होऊनही राज्यात सिंचनाच्या नावानं ठणठणाट आहेत. याच पार्श्वभूमीवर उत्तर महाराष्ट्रातील शिरपूर येथे कमी खर्चातील नवीन अमरीश पटर्न सुरु करण्यात आला आहे. या बंधा-यांमुळे तीस किलोमीटरचा आदिवासी परिसर सुजलाम सुफलाम झाला असून राज्यातील आदिवासी द-याखो-यात हा पटर्न आमुलाग्र बदल घडवून आणू शकतो.

मध्य प्रदेशाच्या सीमेवरील शिरपूर तालुक्यातील बहुतांशी भाग हा द-याखो-यांचा आहे. दुष्काळ हा या भागाच्या पाचवीलाच पुजलाय...शेतीसाठी पाणी तर दूरच पिण्याच्या पाण्यासाठीसुद्धा या भागाला टँकरवर अवलंबून राहावं लागतं. अशा परीस्थितीत नैसर्गिक उतार लक्षात घेत पावसाळ्यातील पाणी अडविण्याचं काम इथं जोमाने सुरु झालय. आमदार अमरिश पटेल यांनी केलेल्या या कामामुळे नव्वद बंधारे तयार झाले असून तीस किलोमीटरचा परिसर `सुजलाम सुफलाम` झालाय.

मुख्यमंत्री, कृषिमंत्री, सहकारमंत्री आणि आरोग्यमंत्री या सर्वानी या सिंचनाच्या नावीन अमरीश पॅटर्नची पाहणी केली. पटेल यांनी शासनाचा एकही पैसा न घेता आपल्या स्वनिधीतून सर्व काम करून दाखवलंय. त्यामुळे परिसरातील विहिरी पुनज्जीवित झाल्या असून बोरिंगलाही अवघ्या वीस फुटावर पाणी मिळू लागलय. मुख्यमंत्र्यांनीही या प्रयोगाचं कौतुक करत अशी कामं सर्व लोकप्रतिनिधींनी आपआपल्या मतदार संघात करण्याचं आवाहन केलय.

कमीत कमी खर्चात एखादा लोकप्रतिनिधी आपल्या निधीतून कसा बदल घडवून आणू शकतो याचं हे उत्तम उदाहरण आहे. त्यामुळे दुष्काळात दिलासा देण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी आपल्या निधीचा याच पद्धतीनं सुयोग्य वापर करणे गरजेचे आहे.

First Published: Monday, October 29, 2012, 08:08


comments powered by Disqus