अण्णा हजारे उतरणार लोकसभेच्या रिंगणात! Anna Hajare Will promote against Padmasingh Patil & Baban Gho

अण्णा हजारे उतरणार लोकसभेच्या रिंगणात!

अण्णा हजारे उतरणार लोकसभेच्या रिंगणात!
www.24taas.com, झी मीडिया, अहमदनगर

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे शिर्डीचे शिवसेना उमेदवार बबन घोलप आणि उस्मानाबादचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पद्मसिंह पाटील यांच्याविरोधात प्रचार करणार आहेत. भ्रष्ट उमेदवारांना आणि त्यांना संधी देणाऱ्या पक्षांना जागा देणाऱ्या पक्षांना जागा दाखविण्याचा निर्धार अण्णांनी केलाय. अण्णांच्या या निर्धारामुळं निवडणुकीतली रंगत आणखी वाढलीय.

रामलिला मैदानावरचे आंदोलन संपल्यानंतर अण्णा हजारे राळेगणमध्येच मुक्कामी होते. अगदी अरविंद केजरीवाल यांचा प्रचार करणंही अण्णांनी टाळलं. आता मात्र अण्णा स्वत: लोकसभेच्या रणधुमाळीत उतरणार आहेत. पद्मसिंह पाटील आणि बबनराव घोलप हे दोन लोकसभा उमेदवारांच्या विरोधात आंदोलन करण्याचा निर्धार अण्णांनी केलाय.

अण्णांनी इशारा दिला असला तरी बबन घोलप यांचा प्रचार जोरात सुरु आहे. नाशिकमधून नगर जिल्ह्यात उतरत त्यांनी थेट अण्णांच्या साम्राज्याला आव्हान दिलंय. अण्णांनी विरोधात प्रचार केला तरी आपलाच विजय होणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.

अण्णा हजारे आणि बबन घोलप यांच्यातला संघर्ष जुनाच आहे, त्यामुळं शिर्डीच्या निवडणुकीकडं आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, March 9, 2014, 20:58


comments powered by Disqus