Last Updated: Sunday, December 16, 2012, 19:54
www.24taas.com, नाशिकयेवल्यातील अतिक्रमणे हटवावीच लागणार असा इशारा सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी अतिक्रमण धारकांना दिलाय. त्यामुळे अतिक्रमण करणा-यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत.
विविध विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी भुजबळ येवल्यात आले होते. यावेळी सर्व्हे क्रमांक 3807 वरील व्यापारी संकुलाचं बांधकाम पूर्ण होऊ द्या मगच आमचे गाळे पाडा अशी विनंती गाळेधारकांच्या वतीने माजी नगराध्यक्ष प्रभाकर कासार यांनी केली.
मात्र अतिक्रमणं पाडण्यास मी सांगितले नसून तो न्यायालयाचा निर्णय असल्याचं सांगत भुजबळांनी त्यांना चांगलच खडसावलं. त्यामुळे आता सर्व्हे क्रमांक ३९०७ आणि ३९०८ वरील अतिक्रमणं पाडण्यावर शिक्कामोर्तब झालय.
First Published: Sunday, December 16, 2012, 19:54