Last Updated: Wednesday, February 13, 2013, 19:38
www.24taas.com, नाशिकनाशिक शहरात गुन्हेगारीचा प्रश्न अत्यंत गंभीर झाला आहे. चोरांना आणि घरफोड्यांना आता पोलिसांचं आणि प्रशासन व्यवस्थेचं काहीच भय न उरल्याचं दिसून येत आहे. याचं ठळक उदाहरण म्हणजे, माजी पोलीस आयुक्त पी टी लोहार यांच्याच घरी घरफोडी झाली आहे.
माजी पोलीस आयुक्त पीटी लोहार यांच्या घरातून चोरट्यांनी तब्बल एक लाख बत्तीस हजारांचे दागिने लंपास केले आहेत. यशवंत कॉलनीतल्या वरद अपार्टमेंटमध्ये झालेल्या या घटनेबाबत गंगापूर पोलिसांत तक्रार देण्यात आली.
नाशिक शहरातले पोलीसच असुरक्षित असतील, तर नागरिकांचं काय, असा प्रश्न निर्माण झालाय. विशेष म्हणजे लोहार कुटुंबियांचे दोन्ही मुलगेही पोलीस विभागात मोठ्या पदावर आहेत.
First Published: Wednesday, February 13, 2013, 19:12