माजी पोलीस आयुक्तांच्याच घरात घरफोडी!

Last Updated: Wednesday, February 13, 2013, 19:38

नाशिक शहरात गुन्हेगारीचा प्रश्न अत्यंत गंभीर झाला आहे. चोरांना आणि घरफोड्यांना आता पोलिसांचं आणि प्रशासन व्यवस्थेचं काहीच भय न उरल्याचं दिसून येत आहे. याचं ठळक उदाहरण म्हणजे, माजी पोलीस आयुक्त पी टी लोहार यांच्याच घरी घरफोडी झाली आहे.