प्रबोधनकारांच्या शिकवणीचा शिवसेनेला पडलाय विसर?Can Shivsena forgotten Prabodhankar Thakre`s teaching

प्रबोधनकारांच्या शिकवणीचा शिवसेनेला पडलाय विसर?

प्रबोधनकारांच्या शिकवणीचा शिवसेनेला पडलाय विसर?
www.24taas.com, झी मीडिया, मनमाड

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं मनमाडमध्ये मंदिर उभारण्यात येणार आहे. यानिमित्त आज विशेष भंडाऱ्याचंही आयोजन करण्यात आलं होतं. बाळासाहेब आणि मीनाताई ठाकरे यांच्या चांदीच्या मूर्तीची या मंदिरात प्रतिष्ठापना करण्यात येईल.

बाळासाहेबांच्या जयंती दिनी मनमाडमध्ये त्यांच्या प्रतिमेची हत्तीवरून मिरवणूक काढण्यात आली. झांज पथक, ढोल ताश्यांच्या गजरात बाळासाहेब ठाकरे आणि मीनाताई ठाकरे यांच्या प्रतिमांची अंबारीतून मिरवणूक काढण्यात आली.

दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतीचे जतन व्हाव यासाठी हे मंदिर उभारण्यात येत असल्याचं शिवसैनिक सांगतायत. मात्र प्रबोधनकार ठाकरेंचा वारसा सांगणाऱ्या शिवसेनेमध्ये हे काय चाललंय, असा प्रश्न यामुळं निर्माण होतोय.

जातीयवाद, मूर्तीपूजा याला कायम विरोध करणाऱ्या प्रबोधनकारांच्या शिकवणीचा शिवसेनेला विसर पडलाय का, असा प्रश्न पडण्यासारखी स्थिती आहे

प्रबोधनकारांच्या माझी जीवनगाथा या आत्मचरित्रामधला उतारा वाचून आचरणात आणण्याची गरज आहे. प्रबोधनकार ठाकरे `माझी जीवनगाथा`च्या पान क्र. 296मधून म्हणतात... "देवळांना पवित्र धार्मिक स्थाने समजण्यापेक्षा...उनाडटप्पूंचे पांजरपोळ मानायला हरकत नाही. आणि असल्याचा या भिक्षुकी तुरुंगात पडलेल्या... देवांना व देवतांना सडकेवरच्या मैल फर्लांगदर्शक...दगड धोंड्यापेक्षा फाजील महत्त्वही कोणी देऊ नये".


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, January 25, 2014, 07:38


comments powered by Disqus