मनोरमा सदन महिला वसतिगृहात धक्कादायक प्रकार

Last Updated: Saturday, June 7, 2014, 10:20

मनमाड शहरातील मुलींचं वसतिगृह असलेल्या मनोरम सदन इथून गेल्या काही महिन्यांपासून मुलींच्या अपहरणाचा प्रकार चर्चेचा विषय बनलेला असताना, पुन्हा एका अल्पवयीन मुलीच्या अपहरणप्रकरणी मनमाड पोलिसांनी 3 महिलांसह 5 जणांना अटक केली अहे.

प्रबोधनकारांच्या शिकवणीचा शिवसेनेला पडलाय विसर?

Last Updated: Saturday, January 25, 2014, 08:13

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं मनमाडमध्ये मंदिर उभारण्यात येणार आहे. यानिमित्त आज विशेष भंडाऱ्याचंही आयोजन करण्यात आलं होतं. बाळासाहेब आणि मीनाताई ठाकरे यांच्या चांदीच्या मूर्तीची या मंदिरात प्रतिष्ठापना करण्यात येईल.

चिमुरड्यांना गरज आहे उपचारासाठी तुमच्या मदतीची!

Last Updated: Friday, October 25, 2013, 11:35

खेळण्याबागडण्याच्या वयात काहीच दोष नसताना थायलेसिमिया मेजर हा गंभीर आजार त्यांना जडला आणि त्यांच्या जगण्याचा हक्क हिरावला गेला. मोलमजुरी करणारे वडील कसेबसे कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. अशात या चिमुरड्यांना गरज आहे उपचारासाठी तुमच्या मदतीची.

दरोडेखोर - पोलिसांत फिल्मी थरार!

Last Updated: Thursday, February 21, 2013, 11:40

दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या दरोडेखोरांच्या एका टोळीस मनमाड पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीनं अगदी ‘बॉलिवूड स्टाईल’ पाठलाग करून अखेर जेरबंद केलंय. टोळीतील एक जण फरार झालाय.

मनमाडमध्ये ‘पाणी’बाणी! कडकडीत बंद

Last Updated: Thursday, February 14, 2013, 12:28

मनमाडमध्ये आज पाण्यासाठी कडकडीत बंद पाळण्यात येतोय. मनमाडकरांनी पाण्यासाठी आक्रमक धोरण स्वीकारलंय. नागरिकांच्या या बंदला सर्वपक्षीय नेत्यांनीही पाठींबा दिलाय.

साहित्य महर्षींच्या भूमीत नाट्यक्षेत्र पोरकं!

Last Updated: Tuesday, January 22, 2013, 13:30

नाशिक शहरातच नव्हे तर उत्तर महाराष्ट्रात नाट्यरसिक आणि कलाकारांची संख्या मोठी आहे. मात्र, त्या तुलनेत ना रसिकांना सुविधा मिळतात ना कलाकारांना...

मुंबईत मेगाब्लॉक, मनमाड मार्गावर लाईनब्लॉक

Last Updated: Saturday, April 14, 2012, 15:31

मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावर रविवारी १५ एप्रिल रोजी सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मेगाब्लॉक चालणार आहे. मध्य रेल्वेवर माटुंगा आणि मुलुंड स्टेशनदरम्यान डाऊन फास्ट मार्गावर दुरुस्तीचे काम चालणार आहे. तर मनमाड-नांदेड मार्गावर १५ एप्रिल रोजी दुपारी २.३0 ते ६.३0 या वेळेत चिकलठाणा ते करमाडदरम्यान लाईन ब्लॉक घेण्यात येईल.

'मनमाड एक्सप्रेस'मध्ये तृतीयपंथींची लूटमार

Last Updated: Saturday, March 3, 2012, 20:23

मनमाड स्टेशनवर एक्स्प्रेसमध्ये तृतीय पंथीयांनी लूटमार करत सात जणांना मारहाण केली आहे. रेल्वे पोलिसांनी तडकाफडकी या टोळीतल्या दोन तृतीय पंथियांना अटक केली.