चिखली येथील अपघातात ४ ठार, Car accident, 4 killed in Chikhali

चिखली येथील अपघातात ४ ठार

चिखली येथील अपघातात ४ ठार
www.24taas.com, झी मीडिया, अमरावती

अमरावतीवरून जळगावला सरपंच परिषदेसाठी जाणा-या स्कोर्पिओ गाडीला चिखली जवळ अपघात झालाय. त्यात ४ जण जागीच ठार तर ४ जण गंभीर जखमी झालेत. आज पहाटे साडेतीन वाजता हा अपघात झाला.

सोलापूर -मलकापूर मार्गावर चिखली एमआयडीसी जवळ भरधाव येणारी स्कोर्पिओ गाडी झाडावर आदळल्याने अपघात झालाय. एम एच -३१-सी एम - ५५९२ असा वाहनाचा क्रमांक आहे. सुरुवातीला पोलिसांनी जखमींना बुलडाणा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी हलविले होते. परंतु गंभीर जखमी असल्याने नंतर अकोला येथे हलविले.

सर्व प्रवासी अमरावती जिल्ह्यातील धामणगाव तालुक्यातील राहणारे आहे. जळगाव येथे सरपंच परिषदेला हजर राहण्य़ासाठी सर्वजण निघाले होते. मृतांमध्ये तीन जण सरपंच आहेत तर एकजण सरपंचाचे पती असल्याचे कळतंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, February 15, 2014, 13:13


comments powered by Disqus