साईंची शिर्डी उजळली दिव्यांनीCelebration of Diwali In Shirdi Saibaba temple

साईंची शिर्डी उजळली दिव्यांनी!

साईंची शिर्डी उजळली दिव्यांनी!
www.24taas.com, झी मीडिया, शिर्डी

दिपावली हा लक्षलक्ष दिव्यांनी आसमंत आणि धरती उजळून काढणारा उत्सव. शिर्डीतही दिपावलीचा उत्सव मोठया उत्साहानं साईभक्त साजरा करतात. वर्षातील सर्वात मोठा सण साजरा करण्यासाठी भक्त शिर्डीत येतात.

साईबाबांनी द्वारकामाईत दिवाळीत चक्क पाण्यानं दिवे लावले होते. म्हणूनच साईंची ही आठवण ठेवत आजही अनेक साईभक्त शिर्डीत येत साईंच्या मंदीर परिसरात दीपावली उत्सवाच्या चारही दिवस हजारो दिवे तेवत ठेवतात. या वर्षीही अनेक साईभक्तांनी शिर्डीत दिवे प्रज्वलित केले आहेत.

साईबाबांच्या सान्निध्यात दिवाळी साजरी कऱण्यासाठी शिर्डीत भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.
यामध्ये लहानग्यांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वजण सहभागी झाले आहेत. साई समाधी मंदीर परिसर दिव्यांच्या लखलखाटात अक्षरशः न्हाऊन निघाला आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, November 3, 2013, 09:44


comments powered by Disqus