जातीचा अडसर, प्रेमी युगुलांची आत्महत्या COUPLES SUICIDE IN JALGAON

जातीचा अडसर, प्रेमी युगुलांची आत्महत्या

जातीचा अडसर, प्रेमी युगुलांची आत्महत्या
www.24taas.com, झी मीडिया, जळगाव

लग्न करण्यासाठी जातीचा अडसर आल्यानं जळगावात प्रेमीयुगुलाने रेल्वेखाली आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली.

वाघ नगर भागात राहणा-या हर्षदा बारीचे मनोज साळवे या तरुणाशी प्रेमसंबंध होते. दोघे लग्न करणार होते मात्र या दोघांची जात वेगळी असल्यानं त्यांच्या घरच्यांचा याला विरोध होता. अखेर दोघांनी शिरसोली गावाजवळ मध्य रेल्वेच्या रुळावर आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवली.

मुलीच्या हातात लिहून ठेवलेल्या चिठ्ठीमुळे या आत्महत्येमागील कारणाचा उलगडा झाला. याप्रकरणी तालुका पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आलाय..

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Tuesday, July 16, 2013, 22:19


comments powered by Disqus