आंतरजातीय विवाह केल्याने कुटुंब वाळीत, Inter caste marriage, family on Boycott

आंतरजातीय विवाह केल्याने कुटुंब वाळीत

आंतरजातीय विवाह केल्याने कुटुंब वाळीत
www.24taas.com,झी मीडिया, नाशिक

आंतरजातीय विवाह केल्याने कुटुंबाला वाळीत टाकल्याची घटना लासलगाव इथे घडलीय. मात्र घटना घडल्यावर तक्रार दाखल करायला पोलिसांनी तब्बल आठ दिवस घेतले.

जातीबाहेर लग्न केल्यामुळे मालतीबाई यांना १० वर्षांपासून जातीबाहेर टाकण्यात आलंय. मात्र हद्दीच्या वादात पोलिसांनी तक्रार दाखल करून घ्यायला आठ दिवसांचा वेळ घालवला. श्रीमती मालतीबाई गरड यांचा ३५ वर्षांपूर्वी जोशी समाजातल्या युवकाशी विवाह झाला. त्याच्या निधनानंतर जोशी समाजाच्या जातपंचायतीने त्यांना त्रास देण्यास सुरूवात केली.

नव-याच्या अंत्यसंस्कारास जाण्यास मज्जाव केला. अंत्ययात्रेला ज्यांनी हजेरी लावली त्यांना अकरा हजारांचा दंडही लावण्यात आला होता.

दरम्यान, लग्न करण्यासाठी जातीचा अडसर आल्यानं जळगावात प्रेमीयुगुलाने रेल्वेखाली आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली. वाघ नगर भागात राहणा-या हर्षदा बारीचे मनोज साळवे या तरुणाशी प्रेमसंबंध होते. दोघे लग्न करणार होते मात्र या दोघांची जात वेगळी असल्यानं त्यांच्या घरच्यांचा याला विरोध होता. अखेर दोघांनी शिरसोली गावाजवळ मध्य रेल्वेच्या रुळावर आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवली.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, July 17, 2013, 17:31


comments powered by Disqus