Last Updated: Monday, September 17, 2012, 15:51
www.24taas.com,राळेगणसिद्धीज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आता नव्या टीमची बांधणी सुरू केलीय. देशभरातल्या सामाजिक कार्यकर्त्यांना अण्णांनी भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाला जुडण्य़ाचं आवाहन केलंय.
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रकाश आमटे आणि अभय बंग यांच्याशी अण्णांनी संपर्क साधल्याचं समजतंय. त्यामुळं आता अण्णांच्या टीमच्या चेहरा मोहरा बदलणार आहे. कालच अण्णांनी भ्रष्टाचार विरोधी आंदोलन छेडण्यासाठी थेट राणेगणसिद्धीचा पत्ता दिलाय.
अरविंद केजरीवाल, किरण बेदी, प्रशांत भूषण, मनीष शिसोदिया या जुन्य़ा सदस्यांशी राजकीय पक्ष स्थापन करण्यावरून अण्णांचे मतभेद झाल्यानंच हा निर्णय घेण्यात आल्याचं समजतंय. चारित्र्यवान लोक निवडणे हाच आता आमचा राजकीय पर्याय आहे, असेही अण्णा हजारे म्हणाले.
First Published: Monday, September 17, 2012, 15:13